• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

जैन हिल्स येथे ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ संकल्पनेचा शुभारंभ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2023
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
जैन हिल्स येथे ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ संकल्पनेचा शुभारंभ

३० फूट उंच केळी बाग, आठ महिन्यात काढणीस तयार

जळगाव (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन म्हणजे श्रद्धेय मोठ्याभाऊंचा १२ डिसेंबर हा दिवस ‘संजीवन दिन’ विविध कार्यक्रमाने साजरा होतो. यात प्रामुख्याने त्यांच्या ८६ व्या जयंतीच्या निमित्ताने ‘हायटेक शेतीचा नवा हुंकार’ कृषी महोत्सवाचे औपचारीक उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते तसेच माजी फलोत्पादन आयुक्त, व महासंचालक तथा पुसा युनिर्व्हसिटीचे माजी कुलगुरू डॉ. एच.पी. सिंग, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, गिमी फरहाद, कृषितीर्थचे संपादक डॉ. सुधीर भोंगळे व कृषि महोत्सवासाठी आलेले अंकुश गोरे यांच्यासह चौसाळा जि. बीड येथील १० शेतकरी, कंपनीचे सहकारी उपस्थित होते. हा कृषी महोत्सव १० डिसेंबर ते १४ जानेवारी २०२४ दरम्यान साजरा होत आहे.

महोत्सवाची मुख्य संकल्पना केळी
या वर्षाची कृषी महोत्सवाची मुख्य संकल्पना केळी असून केळीच्या विविध जाती, इलाक्की, पुवन, नेंद्रण, लाल केळी, बंथल व ग्रॅण्ड नैन, या केळीचे अतिशय देखणे प्लॉट उभे आहेत. केळी पिकातील आधुनिक तंत्रज्ञान, गादी वाफा, ड्रीप, फर्टिगेशन, एकाच बाजुने घड आणण्याचे तंत्रज्ञान, वातावरण बदलावर मात, नेट हाऊसमधील केळी, फ्रुट केअर, ३० फूट उंच केळी बाग असे सर्व व्यवस्थापन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षीक प्लॉट उभे आहेत.

शेतीचे नवतंत्रज्ञान शेतकऱ्यांना जवळून बघता यावे, कंपनीच्या तंत्रज्ञ, शास्त्रज्ञांशी सुसंवाद साधता यावे या दृष्टीने हा कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गत वर्षी या उपक्रमास शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी ऊसाची आधुनिक पद्धतीने केलेली लागवड. सीओ-८६०३२ ऊसाच्या या लागवडीस केवळ ८ महिने २० दिवस झाले आहेत परंतु आज तो अडीच ते तीन किलो वजनाचा आहे व २६ ते ३० कांडे आहेत. त्याचे एकरी अंदाजे १२१ मेट्रीक टन उत्पादन मिळू शकते.

फ्लॅटबेड, राईसबेड आणि मल्चिंगचा उपयोग केलेल्या कापूस लागवड पद्धतीचा प्रयोग, ८ वेगवेगळ्या व्हरायटीचे लसूण, कांदा लागवड, अल्ट्राहायडेन्सीटीच्या फळबागा, पपई, केळी, डाळिंब, चिकू, जैन स्वीट ऑरेंज, रब्बीतले सोयाबीन, शून्य मशागत तंत्रज्ञान, हळदीच्या विविध २० प्रकारच्या जाती, आंतरपीक म्हणून लावलेले आले, फळबागा, केळीच्या सहा वेगवेगळ्या व्हरायटी, ऑटोमेशन, स्मार्ट इरिगेशन, शेतीत वापरली जाणारी यंत्रसामुग्री, विविध अजारे इत्यादी शेतकऱ्यांसाठी मुख्य आकार्षण आहे.

करार शेती अंतर्गत कांदा, टोमॅटो आणि हळद पिकाची केलेली लागवड शेतकऱ्यांना बघता येईल. जैन हिल्स परिसरात भारतभरातून येणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांना शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे. येथे करण्यात येणारे संशोधन, प्रयोग, शेती समोरील नवीन नवीन विषय, आव्हाने त्याबाबत शेतकऱ्यांनी कसा सामना करावा याबाबत योजना, ते सर्व शेतकऱ्यांना जैन हिल्स येथे बघायला मिळेल. या महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे शिवाय थेट जैन हिल्स येथे येऊन शेतकरी या महोत्सवात आपली नोंदणी करून सहभागी होऊ शकतात. या महोत्सवास शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


 

Tags: #jain #jainirrigationjalgaonhttps://kesariraj.com/jain-hils-yethe-haightek-sheti/
Previous Post

सेवानिवृत्त पोलिसाचे बँकेतून एक लाख रुपये लांबविले

Next Post

दुचाकी चोरट्याला चोप, भरबाजारातून चोरीचा केला प्रयत्न !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
दुचाकी चोरट्याला चोप, भरबाजारातून चोरीचा केला प्रयत्न !

दुचाकी चोरट्याला चोप, भरबाजारातून चोरीचा केला प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon