• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 11, 2023
in खान्देश, जळगाव
0
अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

जळगाव (प्रतिनिधी) – नॅशनल एज्युकेशन पॉलिशी-2020 (NEP) या थीम आधारीत नाटिका, नृत्य, समूहगीताव्दारे अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. भारताच्या मध्यमयुगीन शिक्षण प्रणाली ते नॅशनल एज्युकेशन पॉलीशी, मातृभाषेचे शिक्षणातील महत्त्व, सायबर सुरक्षा, आर्थिक सुरक्षा, किमान कौशल्य, स्किल डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्व विकास, स्वयंरोजगार निर्मितीसह, सर्वसमावेशक शिक्षण प्रणाली यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेला नाटिकेतील प्रत्येक क्षण उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना रोमांचकारीचा अनूभव देत होता.

अनुभूती निवासी स्कूलचा नॅशनल एज्युकेशन पॉलिशी 2020 (NEP) या थीमवर आधारित ‘फाउंडर्स डे’ हा अनुभूती स्कूल चे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना समर्पित असतो तो मोठ्या उत्साहात साजरा झाला. सरस्वती वंदना व दीपप्रज्वलनाने सांस्कृतिक कार्यक्रमासह नाटिकेला सुरवात झाली. अनुभूतीच्या ॲम्पी थिएटर मध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गिमी फरहाद, अनुभूती स्कूलचे चेअरमन अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, वरिष्ठ सल्लागार जे. पी. राव, प्राचार्य देबासिस दास व सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन यांची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या उपस्थितीत 12 वी व 10 उत्तीर्ण झालेल्यांचा तसेच गांधी विचार संस्कार परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. ‘अंकुरानुभूति’ व ‘संदेशानुभूति’ नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. शिक्षक अभिनव चतुर्वेदी यांनी वार्षिक उपक्रमांविषयी सांगितले. ३ ते ६ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी अनुभूती स्कूलचा आगामी माँटेसरी विचारधारेवर आधारीत प्री-स्कूल प्रोजेक्टविषयी गायत्री बजाज यांनी अवगत केले. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना कला विभागातील विद्यार्थ्यांनी सचित्र पेटिंग साकारले.

आरंभी योग आणि संगीत यांचे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. त्यानंतर महाराष्ट्र, बिहार, केरळ, उत्तराखंड मधील पारंपारिक नृत्य सादर करून राष्ट्रीय एकात्मकतेचा जागर केला. दक्षिण भारतातील कथ्थक नृत्य, वाघ नृत्याने समारोप झाला. प्राचार्य देबासिस दास यांनी आभार मानले. अनुभूती स्कूलचे विद्यार्थी तुषार, वेदिका, राज, अवयुक्त, अनुष्का, प्राप्ती यांनी सुत्रसंचालन केले.

सर्व समावेश मुल्यशिक्षण संस्कारीत करणारी अनुभूती स्कूल – आयुष प्रसाद

विद्यार्थ्यांमध्ये भावनिकता, संवेदनशीलता संस्कारीत झाली पाहिजे. त्यासाठी निवासी शाळांमध्ये खूप आव्हान असते कारण पालकांचा सहवास कमी असतो. मात्र अनुभूती स्कूल याला अपवाद असून येथील विद्यार्थ्यांमध्ये आत्मीयता, एकमेकांमध्ये परस्परभाव याबाबतचा आत्मविश्वास दिसतो. यामध्ये पालकांचा स्कूलबद्दल असलेला विश्वास अधोरेखित करण्यासारखा आहे. सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यासह सर्व समावेशक मूल्यशिक्षण पुरस्कार करणाऱ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिशीच्या थीमवर सांस्कृतिक कार्यक्रमासह ‘फाउंर्डस डे’ साजरा करणारी अनुभूती महाराष्ट्रातील पहिलीच स्कूल आहे, असे मनोगत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले.

फोटो कॅप्शन –

(_RTM0756) दीपप्रज्वलन करताना जे. पी. राव, आयुष प्रसाद, निशा जैन, देबासिस दास, अशोक जैन, अतुल जैन.

(DSC00270) ‘अंकुरानुभूति’ व ‘संदेशानुभूति’ नियतकालिकाचे प्रकाशन करताना गिमी फरहाद, अतुल जैन, देबासिस दास, आयुष प्रसाद, अशोक जैन, जे. पी. राव, सौ. निशा जैन

(DSC00438) नॅशनल एज्युकेशन पॉलिशी-2020 या धोरणावर आधारीत नाटिका सादर करताना अनुभूती स्कूलचे विद्यार्थी


 

Tags: #anubhuti english midium school #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/anubhuti-nivasi-school-faudars-day/
Previous Post

रखवालदार तरुणांनीच केली होती चोरी, चिंचोलीप्रकरणी ३ अटकेत

Next Post

ऊस पिकाच्या अधिक उत्पादना करीता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे ! – विकास कोबल्लोल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
ऊस पिकाच्या अधिक उत्पादना करीता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे ! – विकास कोबल्लोल

ऊस पिकाच्या अधिक उत्पादना करीता ड्रिप फर्टीगेशन गरजेचे ! - विकास कोबल्लोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
1xbet russia

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
1xbet russia

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट
1xbet russia

कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा, पुण्यात ऑरेंज अलर्ट

June 20, 2025
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
Uncategorized

खत-बियाण्यांचा साठा जप्त,  विनापरवाना कृषी सेवा केंद्रावर भरारी पथकाची धाड

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

June 20, 2025
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मारकाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon