जळगाव (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल आयोजित भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन चोपडा तालुक्यातील वर्डी येथे जिल्हा परिषद मुलामुलींच्या शाळेत करण्यात आले आहे. मंगळवार दि. १२ डिसेंबर रोजी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते रोगनिदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आ. कैलास पाटील, माजी आ. दिलीप सोनवणे, चोपडा तालुका राष्ट्रवादीचे नेते चंद्रहास गुजराथी, डी.पी.साळुंखे, घनश्याम पाटील उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात डॉ.राहुल पाटील, डॉ. जगदीश सरवैया,डॉ.हेमंत पाटील, डॉ.प्रफुल्ल पाटील, डॉ.निलेश चांडक, डॉ. प्रशांत साठे ,डॉ.जगमोहन छाबडा ,डॉ.नीरज चौधरी हे रुग्णांची तपासणी करणार आहे. या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष डॉ. कांतीलाल पाटील, डॉ. सेलचे विभागीय अध्यक्ष डॉ.नितीन पाटील, तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, लहुश न्हायदे, विनायक चव्हाण,
डॉ .भरत धनगर युवक अध्यक्ष चोपडा तालुका, डॉ.सुखदेव गुजर, डॉ.दिनेश चौधरी व चोपडा तालुक्यातील डॉ सेलचे सर्व पदाधिकारी व राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.