भुसावळ महामार्गावरील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- मॉर्निंग वॉकला निघालेल्या प्रौढाला भरधाव ट्रकने चिरडल्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी महामार्गवर घडली. या अपघातात अशोक बरखतमल बजाज (वय ५०, रा.सिंधी कॉलनी, भुसावळ) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भुसावळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातानंतर ट्रक चालकासह क्लीनरने धूम ठोकली. मंगळवारी सकाळी नित्य नियमाप्रमाणे अशोक बरखतमल बजाज हे पायी फिरण्यासाठी निघाल्यानंतर भरधाव ट्रकने (एमएच १८ बीजी ६८३४) ने त्यांना पाठीमागून धडक दिली. ट्रामा केअर सेंटरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. अज्ञात ट्रक चालकाविरुध्द जगदीश गुलाबराव नागदेव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.