• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ताणतणाव मुक्तीसाठी महिलांनी स्वतःला वेळ दिला पाहिजे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 13, 2023
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

मनोविकार तज्ज्ञांचे मार्गदर्शन, महाराष्ट्र अंनिसतर्फे ऑनलाईन व्याख्यान उत्साहात

जळगाव (प्रतिनिधी) :- ताणतणाव मुक्तीसाठी महिलांनी स्वतःला वेळ दिला पाहिजे. तणाव आला तर स्वतःच्या भावनांना मोकळे केले पाहिजे. अनेक महिला फिगरच्या बाबत चिंता व्यक्त करून स्वतःच्या शरीराचे कुपोषण करून घेतात. मात्र त्यामुळे पोषण आहार न मिळाल्यामुळे देखील मानसिक आजारांची सुरुवात व्हायला लागते. त्यासाठी पोषक आहार नियमित घेतला पाहिजे. सुदृढ व मानसिक आरोग्यासाठी नियमित व्यायाम देखील केला पाहिजे, अशा अनमोल टिप्स सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञानी ऑनलाइन मार्गदर्शनामधून दिल्या.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभाग व महिला सहभाग विभागाच्या पुढाकाराने जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या औचित्याने “वेध स्त्रीच्या दुःखाचा, जागर मानसिक आरोग्याचा” हे ऑनलाईन व्याख्यान गुरुवारी १२ ऑक्टोंबर रोजी घेण्यात आले. कार्यक्रमांमध्ये समितीचे मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाचे राज्य कार्यवाह तथा खान्देशातील सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. प्रदीप जोशी आणि सहकार्यवाह, रायगड येथील सुप्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे यांनी मार्गदर्शन केले.

प्रस्तावनेमधून, स्त्रियांचा मनोविश्वाचा वेध घेऊन त्यांच्या मानसिक आरोग्यविषयी मार्गदर्शन मिळणे महत्वाचे असल्याचे महिला सहभाग विभागाच्या राज्य कार्यवाह आरती नाईक यांनी सांगितले. वक्त्यांचा  परिचय अँड. परिक्रमा खोत यांनी करून दिला.

यावेळी डॉ. प्रदीप जोशी म्हणाले की, गरोदर महिलांमध्ये अधिक चिंता रोग आढळतो. खरे तर स्त्रीरोग तज्ञांनी गरोदर महिलांचे डिप्रेशन तपासले पाहिजे. तसेच प्रसूतीनंतर देखील डिप्रेशन जाणवतेच. अनेक स्त्रियांना मानसिक आजार माहीत नसतात.  कुटुंबातून तसेच स्त्रिया स्वतः सुद्धा आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. मानसिक आजाराकडे दुर्लक्ष होणे ही सर्वात मोठी अडचण आहे. काही महिलांना सारखी चिंता करणे हा आजार दिसून येतो. स्वतःविषयी किंवा कुटुंबातील सदस्यांच्या भविष्याविषयी चिंता वाटत असते.

ग्रामीण भागातील अनेक महिलांना तर मनातील भावना व्यक्त होत नाहीत. त्यामुळे अंगात येण्याचे प्रकार दिसून येत असतात. नोकरीच्या ठिकाणी देखील उत्तम कामगिरी करून दाखवण्याचे सातत्याने महिलांवर दडपण असते. त्यामुळे काहीतरी बेस्ट करून दाखवण्याचा प्रयत्न करताना महिला मानसिकरित्या थकून जात असते, असेही डॉ. जोशी म्हणाले.

डॉ. अनिल डोंगरे यांनी, विविध आजारांची माहिती देऊन त्यांची लक्षणे सांगितली. तसेच त्यावरील उपाय देखील समजावून सांगितले. मासिक पाळी लांबली तर चिडचिड होणे, उदास वाटणे असे अनेक त्रास होतात.  तसेच पोस्ट पार्टम डिप्रेशन म्हणजेच बाळंतपणानंतर स्त्रीला हा मानसिक त्रास होतो. त्या स्त्रियांना रडू येते. आपले बाळ व्यवस्थित नाही असे वाटते. अनेकदा झोप येत नाही. हा आजार पाच टक्के स्त्रियांना दिसून येत असतो.

तसेच शेतकरी महिलांमध्ये आत्महत्येचे प्रमाण कमी दिसते.  कुठल्याही स्त्रियांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी मानसिक आजारांकडे दुर्लक्ष करू नये. तणाव जाणवला तर विश्वासू व्यक्तीशी बोलले पाहिजे. वेळ पडले तर तज्ञांची चर्चा केली पाहिजे. महिलांना कुठेही कमी न लेखता त्यांना सन्मान देऊन, टिंगल टाळून कुटुंबीयांकडून सन्मान झाला पाहिजे,  असे मत डॉ. डोगरे यांनी व्यक्त केले.

सूत्रसंचालन तुळशीदास भोईटे यांनी केले तर आभार कविता मते यांनी मानले. तांत्रिक सहाय्य सिद्धेश गोसावी आणि किर्तीवर्धन तायडे यांनी केले.  व्याख्यानासाठी राज्यभरातील ५०० च्या वर नागरिकांनी सहभाग नोंदविला.


 

 

Tags: #maharashtra anis newshttps://kesariraj.com/tantanav-muktisathi-vel-dila/
Previous Post

रेल्वेखाली उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

Next Post

आत्महत्येचे सत्र थांबेचना, आणखी एका अल्पवयीन तरुणीची आत्महत्या !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आत्महत्येचे सत्र थांबेचना, आणखी एका अल्पवयीन तरुणीची आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत
1xbet russia

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा
1xbet russia

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
ग्रामसेवक संघटनेचे रावेर तालुका अध्यक्ष, सचिवाविरुद्ध ग्रामसेविकेची फिर्याद
1xbet russia

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोकड लंपास

March 5, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

डॉक्टरांना अडवून मारहाण करीत १५ हजारांची लूट; न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

March 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतकऱ्यांच्या १७ पाणबुडी मोटार, ४ दुचाकी चोरांकडून हस्तगत

भुसावळ येथील विवाह सोहळ्यातील दागिन्यांची चोरी उघड

March 5, 2026
‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon