• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चाळीसगावात दुचाकीसह रिक्षा चोरी करणारे तिघांना अटक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 28, 2023
in Uncategorized
0
चाळीसगावात दुचाकीसह रिक्षा चोरी करणारे तिघांना अटक ; गुन्हा दाखल

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरात दुचाकीसह रिक्षाची चोरी करणाऱ्या तिघांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली असून याबाबत तिघांविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

फिर्यादी तन्वीर शेख रा. चाळीसगाव यांनी दि . २३ सप्टेंबर रोजी शहरातील गणेश कॉम्पलेक्स परिसरात त्यांची ४९,०००/- रु. कि.ची मोटार सायकल उभी केलेली होती. अशात अज्ञात दोन इसम ते चोरी करून घेऊन जात असतांना फिर्यादी यांना दिसून आले. त्यांनी लगेच आजुबाजुच्या लोकांच्या मदतीने त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यातील एक इसम गर्दीचा फायदा घेऊन पळून गेला होता. सदर घटनेची माहिती प्राप्त होताच तात्काळ चाळीसगाव शहर पो.स्टे. कडील पोना दिपक पाटील, महेंद्र पाटील, पोकों अजय पाटील, अमोल भोसले, शरद पाटील हे घटनास्थळी हजर होऊन ताब्यातील इसमास पोलीस स्टेशनला हजर केले. व तन्वीर शेख यांच्या तक्रारीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात ताब्यातील आरोपी एकनाथ चव्हाण रा. लोंजे ता.चाळीसगाव याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली देऊन सदर गुन्ह्यात त्याचा मित्र गणेश जयराम चव्हाण याने प्रोत्साहन तसेच मदत केल्याची माहिती दिली. तरी सदर गुन्ह्यात गणेश चव्हाण याचा सहभाग निष्पन्न झाल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथील पोलीस निरिक्षक संदीप पाटील यांनी त्यास तात्काळ शोध घेणेकामी सुचना देऊन आदेशीत केले. त्याप्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील पोउपनि सुहास आव्हाड, पोहेकॉ योगेश बेलदार, पोना दिपक पाटील, महेंद्र पाटील, पोकॉ अमोल भोसले, शरद पाटील, गणेश कुवर, निलेश पाटील, मोहन सुर्यवंशी, नंदु महाजन, प्रविण जाधव . विनोद खैरणार यांनी गणेश चव्हाण यांच्या त्याचे राहते गावी शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेऊन अटक केलेली आहे. तसेच सदर आरोपी मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कस्टडी मिळाली आहेत.

त्याचबरोबर सन २०२१ मध्ये शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा जवळ फिर्यादी नामे मोहम्मद आसिफ इसा शहा यांची २,८००००/- रुपये किंमतीची रिक्षा चोरीस गेली होती. त्याबाबत चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास चाळीसगाव शहर पो.स्टे. कडुन कसोशीने करण्यात येत होता. सदर गुन्हा हा आरोपी नामे शेख फारुख उर्फ लावारीश शेख गफ्फार (वय-५२) रा. अब्दुल खालीक नगर, ईस्लामपुरा, मालेगाव जि. नाशिक याने केल्याची माहिती पो.ना. दिपक पाटील यांना प्राप्त झाली. सदर आरोपीस तात्काळ ताब्यात घेऊन त्याकडे सखोल चौकशी केली. त्यावर त्याने रिक्षा चोरीबाबत कबुली देऊन सदरची रिक्षा काढून दिलेली आहे. सदर आरोपीतास दि. २५ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेली असुन मा.न्यायालयाचे आदेशाने सदर आरोपी सध्या पोलीस कस्टडीत आहे.

दरम्यान सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे. तो लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने मोटार सायकलस्वार, रिक्षाचालक, चारचाकी वाहन यांच्याकडेस मदत मागतो . आणि त्यांनी लिफ्ट दिली असता त्यांना विश्वासात घेऊन गुंगीकारक औषध मिश्रीत करून कचोरी, पेढे असे खाऊ घालतो. ते बेशुध्द होताच त्यांच्या ताब्यातील रिक्षा किंवा मोटार सायकल चोरी करुन पळ काढत असे. सदर आरोपीविरुध्द खुलताबाद, मालेगाव व इतर ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक अभयसिंग देशमुख यांच्यासह पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोना दिपक पाटील व पोकॉ अमोल भोसले करीत आहेत.


 

 

Tags: #chalisgaon crime news #jalgaon #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/duchakisah-riksha-chori-karnars/
Previous Post

जळगाव शहरातून १२ गुन्हेगार दोन दिवसांसाठी हद्दपार ; प्रांताधिकाऱ्यांचे आदेश

Next Post

जळगांव रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त श्रमदान

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगांव रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त श्रमदान

जळगांव रेल्वे स्टेशन येथे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त श्रमदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !
1xbet russia

एटीएम कार्ड बदलून तरुणीची ५० हजारांची फसवणूक; चोपडा शहरातील घटना

May 23, 2026
पेट्रोल भरण्याच्या किरकोळ वादातून मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा
1xbet russia

पेट्रोल भरण्याच्या किरकोळ वादातून मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

May 23, 2026
तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

गळफास घेत २० वर्षीय तरुणाची आत्महत्या; चाळीसगाव तालुक्यातील घटना

May 23, 2026
नाशिक जिल्ह्यातील तरुणाला गावठी कट्ट्यासह अटक
1xbet russia

जागेच्या वादातून दोन गटांत मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

May 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

ग्राहकांकडून गोळा केलेले हप्ते परस्पर लांबवून केला ११ लाख ५२ हजारांचा अपहार !

एटीएम कार्ड बदलून तरुणीची ५० हजारांची फसवणूक; चोपडा शहरातील घटना

May 23, 2026
पेट्रोल भरण्याच्या किरकोळ वादातून मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

पेट्रोल भरण्याच्या किरकोळ वादातून मारहाण; पाच जणांविरोधात गुन्हा

May 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon