जळगाव (प्रतिनिधी) – सार्वजनिक गणेशोत्सवनिमीत्त एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जळगाव शहरात दि. २८ व २९ रोजी येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याबाबतचे मनाई आदेश प्रांताधिकारी महेश सुधळकर यांनी काढले आहे.
आकाश अरुण दहेकर, (रा. जाखनीनगर, कंजरवाडा) जळगाव, पियुष उर्फ वाघ्या मुकुदा ठाकुर (रा. तुकारामवाडी), रोहित उत्तम भालेराव (रा. कासमवाडी), रोशन उर्फ बबलु हिलाल धनगर, (रा. सम्राट कॉलनी) , खुशाल उर्फ काल्या बाळु मराठे (रा. आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी), मायकल उर्फ कन्हैया नेतलेकर (रा. संजय गांधी नगर, कंजरवाडा), बिजासन फकीरा घुगे (रा. मेहरुण तांबापुरा), सनी उर्फ सुनिल महादु सोनवणे (रा. तांबापुरा), लोकेश चंद्रकांत दंडगव्हाळ, (रा. अयोध्यानगर), विजय गुलाब मराठे (रा. सुप्रिम कॉलनी), कृष्णा रघुनाथ भालेराव (रा. कुसुबा), अजय विजय भिल (रा. शिरसोली) यांचे कडुन गणेशोत्सवा दरम्यान गुन्हा घडु नये व सण हा भयमुक्त व शांततेत पार पडावा याकरीता एमआयडीसी पोस्टेकडून त्यांना गणेशोत्सवात जळगाव शहरात प्रवेश करण्यास मनाई करणेकामी प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
त्याप्रमाणे उपविभागीय दंडाधिकारी महेश सुधळकर यांनी आदेश काढुन त्यांना गणपती विसर्जनाकरीता दि. २८ व २९ रोजी जळगाव शहरात प्रवेश करण्यास मनाई आदेश काढलेले आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरिक्षक जयपाल हिरे, सफौ/अतुल वंजारी, पोह/दिपक चौधरी, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मुंढे, राहुल रगडे, विशाल कोळी यांनी केलेली आहे.