जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गणेशोत्सवानिमित्त “उदगम” उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त विविध उपक्रम घेतले जात आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. यंदाचे हे सहावे वर्ष आहे. ढोलताशांच्या गजरात श्री गणेशाचे आगमन झाले. २० सप्टेंबर रोजी “मेडप्लेसिया” हा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचे उदघाटन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप अधिष्ठाता डॉ. गजानन सुरेवाड, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. किशोर इंगोले, डॉ. प्रवीण लोहार, डॉ. अब्दुल राफे उपस्थित होते.
यावेळी डॉ. ठाकूर यांनी, वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा करताना शिस्त व समर्पण हवे. त्यामुळे रुग्णांना आपुलकी वाढते. यानंतर कार्यक्रमात प्रश्नमंजुषा व वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. दि. २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. दि. २२ व २३ रोजी अनुसंधान व कृती संशोधन प्रकल्प प्रदर्शन घेण्यात आले. तसेच इनडोअर खेळ घेण्यात आले. त्यात बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन यांचा समावेश होता. दि. २५ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाचा समारोप होईल. यात खजिना शोध, सॅन्टम क्वीज घेतले जाणार आहे.