आ. बच्चू कडूंची प्रमुख उपस्थिती
जळगाव (प्रतिनिधी) :- आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना प्रातिनिधीक स्वरुपात शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. या लाभार्थ्यांना व्यासपीठावर बसण्याची संधीही मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, परिविक्षाधीन जिल्हाधिकारी अर्पित चव्हाण, स्वयंदिप फाउंडेशनच्या मिनाक्षी निकम, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, दिव्यांग अधिकारी भरत चौधरी, प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय भोसले, संभाजी सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषद दिव्यांग निधीतून उद्योगासाठी १५ लाख रूपयांची मदत देण्यात आलेले लाभार्थी मिनाक्षी निकम, दिव्यांग प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले लाभार्थी दाम्पत्य हर्षल काशिनाथ गवळी व वनिता हर्षल गवळी, पालकत्व प्रमाणपत्र लाभार्थी नंदकुमार रोकडे, संजय गांधी निराधार योजना लाभार्थी संदीप सुनिल कोळी, रोजमीन मजीद ली, बीज भांडवल कर्ज लाभार्थी अरूण ज्ञानेश्वर पाटील, युडीआयडी कार्ड लाभार्थी दिव्या बेहरे,हिमांशी किरण पाटील, दिव्या पुंडलिक पाटील, राजेश शंकर ओझा, एमआर कीट लाभार्थी उमेश जाधव, सारिका शत्रुघ्न पाटील, निकिता संतोष चौधरी, सारंग गोरे, प्रणव पाटील, कर्णयंत्र लाभार्थी देवेश्वरी निलेश माळी, हुमेरा मेहमूद खान पठाण, आधारासाठी काठीचे लाभार्थी शेख अजमद अजीज, पीएम स्वनिधी लाभार्थी वसंत नथ्थू शिंपी, वैयक्तिक कर्ज योजनेचे लाभार्थी बापू प्रभाकर सपकाळे यांना बच्चू कडू यांच्या हस्ते लाभ प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
मेळाव्यासाठी उपस्थित दिव्यांग बांधवांना समाजकल्याण विभागाने अर्ज वाटप केले होते. त्यावर कुठल्या योजनेसाठी तुम्ही अर्ज केलाय, याची माहिती व वैयक्तिक माहितीचा समावेश होता. हे अर्ज घेण्यासाठी स्वतः बच्चू कडू व्यासपीठावरून उतरून त्यांच्याकडे गेले. त्यांचे म्हणणे ऐकून घेत हे अर्ज स्वीकारले. दिव्यांगांना कार्यक्रम समजावा, यासाठी दुभाषिकांनी महत्त्वाची भूमिका निभावली. दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ कार्यक्रमस्थळी विविध विभागांच्या २५ मदत कक्षांची उभारणी करण्यात आली होती. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार धर्म उद्योग विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, यांच्याबरोबरच बार्टी, महाज्योती, सारथी, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व तसेच विविध सेवाभावी संस्था आदींच्या मदत कक्ष – स्टॉल्सचा समावेश होता.