• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राष्ट्रीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद प्रवीण सोनकुल यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाचा बहुमान !!!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 13, 2023
in Uncategorized
0
राष्ट्रीय वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाला विजेतेपद प्रवीण सोनकुल यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाचा बहुमान !!!

शिवम शेट्टी, श्रीनिधी काटकर, अभिजीत खोपटे व नीशिता कोतवाल यांना सुवर्णपदके

जळगाव (प्रतिनिधी ) – आसाम येथे पार पडलेल्या ३९ व्या राष्ट्रीय सीनियर क्योरोगी तायक्वांदो स्पर्धा व १२ वी राष्ट्रीय सीनियर पूमसे तायक्वांदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने सर्वाधिक पदकांसह प्रथम स्थान मिळवले आहे. आंतरराष्ट्रीय पदक विजेता शिवम शेट्टी, श्रीनिधी काटकर, अभिजीत खोपटे व नीशिता कोतवाल यांना ४ सुवर्णपदके जिंकली असून महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रवीण सोनकुल यांना सर्वोत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्काराने भारतीय संघटनेकडून सन्मानित करण्यात आले असल्याची माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे व महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली.

गुवाहाटी, आसाम येथे ९ ते ११ सप्टेंबर २०२३ दरम्यान ३९ व्या राष्ट्रीय सीनियर क्योरोगी तायक्वांदो स्पर्धा व १२ वी राष्ट्रीय सीनियर पूमसे तायक्वांदो स्पर्धा पार पडली.
वरिष्ठ गटात राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातील खेळाडूंनी ४ सुवर्णपदक जिंकणे हे प्रथमच घडले आहे. शिवम शेट्टी, अभिजीत खोपडे , श्रीनिधी काटकर व निशिता कोतवाल यांनी ४ सुवर्णपदके जिंकून इतिहास घडवला. नम्रता तायडे , स्वराज शिंदे व प्रसाद पाटील यांनी ३ कांस्यपदके पटकावली आहेत. पूमसे प्रकारामध्ये वैयक्तिक ६० वर्ष गटात मनीषा गरवालिया, ३० वर्षाखालील गटात मृणाली हरणेकर यांनी रौप्यपदक जिंकले आहे. वंश ठाकूर, शिवम भोसले व तनिष मालवणकर यांनीही रौप्यपदके जिंकली आहेत.
महाराष्ट्र टीम प्रमुख तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झालेल्या महाराष्ट्र संघाने चांगली कामगिरी केली. महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहत असलेले प्रवीण सोनकुल यांना तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया कडून “बेस्ट क्योरोगी कोच” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र संघाचे कोच म्हणून प्रवीण संकुल यांच्यासोबत जयेश बाविस्कर, संघ व्यवस्थापक प्रमोद कदम, पुमसे कोच रॉबिन सर, मॅनेजर विद्या जाधव तसेच अमोल तोडणकर, अरविंद निशाद आदी सर्व सपोर्टिंग कोच यांनीही महत्त्वाची जबाबदारी निभावली.
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव तथा शिवछत्रपती पुरस्कार विजेते श्री मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष वेंकटेश्वर कररा, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे व धुलीचंद मेश्राम, सचिव सुभाष पाटील, तसेच राज्य संघटनेचे सदस्य नीरज बोरसे, अजित घारगे, सतीश खेमसकर यांनी सर्व पदक विजेते खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड !!

आसाम येथील राष्ट्रीय सीनियर तायक्वांदो स्पर्धेतील सर्व पदक विजेत्या खेळाडूंची गोवा येथे ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. अभिजीत खोपडे (५८ किलो), शिवम शेट्टी (६३ किलो), स्वराज शिंदे, (६८ किलो), प्रसाद पाटील (७४ किलो), श्रीनिधी काटकर (८७ किलो), साक्षी पाटील, (४६ किलो), मृणाल वैद्य  (४९ किलो), निशिता कोतवाल ( ५३ किलो), भारती मोरे (६२ किलो), नम्रता तायडे  (७३ किलो) या सर्व खेळाडूंची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे महासचिव मिलिंद पठारे यांनी दिली.


 

 

Tags: #jain sport acadamy news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/rashtriy-varishth-taykvando-1/
Previous Post

अवैध दारू बाळगणाऱ्या पारोळा न्यायालयाकडून शिक्षा

Next Post

तरूणाला फायटरने मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वीजतारांवर आकोडा टाकण्यावरून हाणामारी

तरूणाला फायटरने मारहाण ; गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू
1xbet russia

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन
Uncategorized

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी
1xbet russia

जळगाव जिल्ह्यात तोतया’ पत्रकारांचा सुळसुळाट; पोलीस अधीक्षकांनी कारवाई करण्याची मागणी

August 12, 2026
कोयत्यासह घरात घुसून दहशत; सात जणांविरुद्ध गंभीर गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला; एमआयडीसी परिसरातील हॉटेलमधील घटना

August 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

जळगावात रस्त्यावर आढळले मृत अर्भक; जुने जळगाव परिसरातील घटना, शनीपेठ पोलिसांकडून तपास सुरू

August 12, 2026
जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

जळगाव जिल्हा दूध संघात १३ ऑगस्टला शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचेही उद्घाटन

August 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon