पारोळा पोलीस स्टेशन येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – पारोळा येथील पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक जयवंत प्रल्हाद पाटील यांना गुन्ह्यात तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांना अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
धुळे तालुक्यातील अंचाळे येथील ४२ वर्षीय तक्रारदार यांचेवर व त्यांचे नातेवाईकावर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात यातील तकारदार व त्यांचे नातेवा
ईक यांना अटक न करण्यासाठी तसेच न्यायालयात दोषारोप पत्र लवकरात लवकर पाठविण्यासाठी यातील तक्रारदार यांचेकडे पोलीस उपनिरीक्षक जयवंत पाटील यांनी ३० हजार रुपयांची मागणी केली. या अगोदर २० हजार रुपये घेतले व उर्वरित १० हजार रुपये नंतर घेवून या असे सांगितले. त्यानंतर आज दि.१२ सप्टेंबर रोजी पोउनि जयवंत पाटील यांनी पंचासमक्ष १० हजाराची मागणी करून तडजोडअंती ८ हजार स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलिस उप अधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक एन. एन . जाधव, अमोल वालझाडे, पो.ना. बाळू मराठे, पो.कॉ. अमोल सुर्यवंशी, पो.कॉ. सचिन चाटे, स. फौ. दिनेशसिंग पाटील स.फौ.सुरेश पाटील, पो.ह.रविंद्र घुगे,म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ. राकेश दुसाने, पो. कॉ. प्रणेश ठाकुर आदींनी कारवाई केली.