जिल्ह्यातील मुख्याधिकाऱ्यांचा उज्जैन व इंदूर महापालिकेचा अभ्यास दौरा उत्साहात
घनकचरा व्यवस्थापन, नागरी पायाभूत सुविधांच्या विकासात झालेल्या सुधारणांचा अभ्यास
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील २० नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशातील उज्जैन आणि इंदूर महानगरपालिकांची भेट घेत अभ्यास दौरा पूर्ण केला. या अभ्यास दौऱ्यात घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी पायाभूत सुविधांच्या विकासात झालेल्या सुधारणांबाबत मुख्याधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार हा दौरा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उज्जैन व इंदूर महानगरपालिका संस्थांनी घनकचरा व्यवस्थापन आणि नागरी पायाभूत सुविधांच्या विकासात झपाट्याने सुधारणा दाखवल्या आहेत. नागरी प्रशासनातील लोकसहभागाचेही कौतुक करण्यात आले आहे. पायाभूत सुविधांचा विकास आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत. माझी वसुंधरा अभियानात जळगाव जिल्ह्याने चांगली कामगिरी केली आहे.