• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

गोजोरे येथील घरफोडीतील अट्टल गुन्हेगारांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 19, 2023
in Uncategorized
0


भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील महिलेचे बंद घर फोडून ६ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लांबविणाऱ्या चार संशयित आरोपींना भुसावळ तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  त्यांच्याकडून इतर चोरीचा एकूण १० लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत इतर चोरीचे गुन्हे देखील उघडकीला आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील गोजोरे गावात मालतीबाई अभिमान चौधरी (वय-५७) ह्या आपल्या पती व मुलीसह राहायला आहे. २६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता घराला कुलूप लावून पुण्याला गेले होते.  घर बंद असल्याचे पाहून चोरट्यांनी बंद घर फोडून ६ लाख १३ हजार ६०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले होते. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक मदत व  सीसीटीव्ही फुटेच्या आधारे गुन्ह्याच्या शोध घेणे सुरू केले. तसेच गावात बैठका घेऊन गावाची सुरक्षा घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व गावात रात्रीची ग्रस्त घेण्यात आली. दरम्यान १२ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास  दुचाकीवर तीन जण संशयितरित्या फिरत असताना दिसून आलेत. गावकऱ्यांनी तिघांना ताब्यात घेत पोलीसांच्या स्वाधिन केले.  पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज मधील आणि ताब्यात घेतलेला तीन आरोपींमधील एकाची ओळख पटली. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. संशयित आरोपी रवी प्रकाश चव्हाण (वय-१८) रा. शबरीनगर, तांबपुरा जळगाव, जुनेद उर्फ मुस्तकीन शहा भिकन शहा (वय-२२) रा. तांबापुरा आणि सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा अशा तिघांना ताब्यात घेतले.

यातील संशयित आरोपी रवी चव्हाण यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात ३ तर रामानंदनगर पोलीस ठाण्यात २ चोरीचे गुन्हे दाखल आहेत तर जुनेद उर्फ मुस्तकीन शहा भिकन शहा याच्यावर देखील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी या शहरीतील सोन्याचे दागिन्यांची विल्हेवाट त्यांच्या साथीदार गुरुदयालसिंग मनजितसिंग टाक याने गुजरातमध्ये जाऊन विकले होते.  गुरूदयासिंग टाक यांच्यावर देखील चोरीचे गुन्हे दाखल आहे. दरम्यान पोलिसांनी या चौघांकडून रोख रक्कम, सोने चांदीचे दागिने असा एकूण १० लाख ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीविक्षाधिन पोलीस उपाधीक्षक सतीश कुलकर्णी, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार, संजय तायडे, युनिक शेख, दीपक जाधव, प्रेमचंद सपकाळे, धीरज मंडलिक, सादिक शेख, राजीव काझी, उमाकांत पाटील तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे जगदीश भोई, प्रशांत चव्हाण यांनी कारवाई केली. या चौघांकडून अजून काही चोरीचे गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/gajore-yethil-gunhegaranna-atk/#bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

आत्महत्या सुरूच, नैराश्यातून तरुणीने गळफास घेऊन जीवन संपविले !

Next Post

नगरसेवक दत्तात्रय कोळी यांचे देहावसान ; संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नगरसेवक दत्तात्रय कोळी यांचे देहावसान ; संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
1xbet russia

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
Uncategorized

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

चाळीसगाव हादरले! १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून अत्याचार; पीडितेने दिला बालकाला जन्म

July 18, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

एकाच रात्री पाच वाहनांतील बॅटऱ्या लंपास; संशयित काही तासांत जेरबंद

July 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध

July 18, 2026
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी

 भरधाव वाळूच्या डंपरची धडक; गंभीर जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

July 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon