जळगाव (प्रतिनिधी) : मेहरूण परिसरातील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप” अंतर्गत आमच्या विद्यालयात ७६ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शालेय परिसरात प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.
प्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य केले. तसेच विविध विषयांवर भाषणे केली. तसेच परिसरात पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेच्या संचालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन रुपाली आव्हाड यांनी केले. प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष शामकांत सोनवणे, संचालक भागवत सानप, एकनाथ वंजारी, शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक व सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.