जळगाव उपविभागीय पोलीस पथकांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरुन काळाबाजार करणाऱ्या दोघांवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने काल शुक्रवारी कारवाई केली. त्यांच्याकडून गॅस सिलेंडरसह गॅस भरण्याचे मशिन असा एकूण हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी वसीम कदीर पटेल (वय २५, रा. मेहरुण) व शेख आसिफ शेख शकील (वय १८, रा. संतोषीमाता नगर, मास्टर कॉलनी) यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरगुती गॅसचा काळाबाजार करून तो अवैधरित्या वाहनांमध्ये भरीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना मिळाली. त्यांनी लागलीच पोहेकॉ अल्ताफ पठाण, पोकॉ सचिन साळुंखे, राहुल पाटील, श्रीकांत बदर, शिवाजी हटकर, चार्ली पथकातील ज्ञानेश्वर हटकर,किशोर पाटील यांचे पथक तयार करुन कारवाईसाठी रवाना केले. यापथकाने जळगाव ते संभाजी नगरकडे जाणाऱ्या महामार्गावरील जळगाव तोलकाट्याजवळ एक इसम टपरीमध्ये घरगुती गॅस अवैधरित्या वाहनांमध्ये भरत होता. पथकाने त्याच्यावर छापा टाकला. त्याठिकाणाहून १५ हजारांचे ६ गॅस सिलेंडर, १३ हजारांचा वजन काटा, ७ हजारांची मोटार व शंभर रुपयांच्या नळ्या असा एकूण ३५ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी शेख आसिफ शेख शकील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजिंठा चौफुली जवळही कारवाई
भुसावळ रोडवरील अजिंठा चौफुलीजवळ एका हॉटेलच्या मागे टपरीच्या आटोशाला एक संशयित घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये करण्यात आला आहे.
गॅस भरीत काळाबाजार करतांना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून १० हजारांचे ४ गॅस सिलेंडर, १३ हजारांचा वजन काटा, ७ हजारांची मोटार व १०० रुपयांची नळी असा एकूण ३० हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी सचिन सपकाळे यांच्या फिर्यादीवरुन संशयित वसीम कादिर पटेल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.