एमआयडीसी पोलिसांची यशस्वी कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी ) – एमआयडीसी परिसरामध्ये असलेल्या प्रभा पॉलीमरजवळ आकाश प्रेम तंवर याच्यावर गुरुवारी १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहाला संशयित आरोपी स्वप्नील उर्फ सोपान चंदुसिंग मोरे याने गोळीबार केला होता. या संशयिताला केवळ अर्ध्याच तासात मन्यारखेडा फाट्याजवळून एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत मुद्देमाल बंदूक व काडतूससह अटक केली आहे. संशयिताला लगेच अटक करण्यात यश आल्यामुळे एमआयडीसी पोलिसांचे पोलीस अधीक्षकांसह नागरिकांनी कौतुक केले आहे.
एमआयडीसी परीसरात दिवसा गोळीबार झाल्यामुळे व सदरचा गुन्हा गंभीर असल्यामुळे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी घटनास्थळी भेट देत आरोपी पकडणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे सदर गुन्हयाचा तपास सुरु होता. यादरम्यान पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली की, सदर गोळीबार करणारा स्वप्नील हा मन्यारखेडा येथे आहे. माहीती मिळाल्यावर लागलीच मन्यारखेडा येथे गुन्हे शोध पथकाचे पोउनी दिपक जगदाळे, सफौ अतुल वंजारी, पोना सुधीर सावळे, इमरान सैय्यद, सचीन मुंढे, योगेश बारी, किशोर पाटील, सचीन पाटील, मुदस्सर काझी, मुकेश पाटील, छगन तायडे, किरण पाटील, साईनाथ मुंढे, महिला पोना निलोफर सैय्यद अशांनी जावून त्याला मन्यारखेडा फाट्याजवळून ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले असून व त्याचे अंगझडतीमधे त्याने गुन्हयात वापरलेले २० हजार रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा आणी एक जिवंत काडतुस काढुन दिलेले आहे. त्याला अटक करण्यात आली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असुन गुन्हयाचा तपास पोउनी दिपक जगदाळे, योगेश बारी हे करीत आहेत.