राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने बुधवारी ९ ऑगस्ट रोजी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात धुळे येथून सय्यद साजिद अहमद यांची जळगावच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने बुधवारी गट अ व गट ब संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात सय्यद साजिद अहमद हे अधिकारी धुळे येथील मृद व जलसंधारण विभागातून जळगावी येत आहेत. त्याचबरोबर उपविभागीय जलसंधारण अधिकारी, जिल्हा परिषद विभाग, शिरपूर जि. धुळे येथून त्याच पदावर टी. जे. राजवाडे हे मृद व जलसंधारण विभागाच्या उपविभागात पारोळा येथे येत आहेत.