याबाबत सूत्राने दिलेली माहिती अशी की पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सोळा वर्ष आठ महिन्याच्या मुलीला पाच ऑगस्ट च्या रात्री दहा ते सहा ऑगस्टच्या पहाटे तीन वाजेच्या दरम्यान संशयित पवन नंदलाल कुमावत राहणार भातखंडे तालुका पाचोरा याने मुलीला कुठले तरी आमिष दाखवून पळून नेल्याची फिर्याद मुलीच्या आईने ७ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पाचोरा पोलीस स्टेशनला दिल्यावरून संशयित पवन कुमावत याचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक विजय वसावे करीत आहे.