भुसावळ (प्रतिनिधी) – बाेदवड तालुक्यातील रेवती येथील १६ वर्षीय मुलाच्या खून प्रकरणी बुधवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी. भन्साली यांनी दोन महिलांसह ६ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा एेकताच या दोन महिलांना रडू काेसळले. न्यायालयाने आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि ३० हजार ६०० रूपयांचा दंड केला आहे.
रेवती येथील दीपक सुदाम पारधी (वय १६) यामुलाला १९ अॅाक्टाेबर २००७ रोजी किरकाेळ कारणावरून ११ संशयितांनी चापटाबुक्यांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली हाेती. दीपकच्या पाेटावर अाणि गुप्तांगावरसुध्दा मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बाेदवड पाेलिस ठाण्यात ११ जणांिवरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. यात दाेन अल्पवयीन मुले अाहे. हा खटला जळगाव येथील जिल्हा न्यायालयात सुरू हाेता. भुसावळ येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू झाल्यावर हा खटला भुसावळ न्यायालयात वर्ग करण्यात अाला. न्यायाधीश एस. बी. भन्साली यांच्यासमोर खटल्यातील अाठ जणांची साक्ष नाेंदवली. यात दीपक याचा भाऊ विजय पारधी, वडील सुदाम पारधी यांच्यासह तपासाधिकारी पी. बी. जाधव, जी.एस. माेरे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. अाराेपींचे वकील अाणि सरकारी वकील यांचा युक्तीवाद एेकून घेत न्यायाधीश भन्साली यांनी बुधवारी शिक्षेचा निकाल दिला. न्यायाधीश भन्साली यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावताच सर्व अाराेपींना रडू काेसळले.
या अाराेपींना झाली जन्मठेप । खटल्यात सुपडू अर्जून भील (वय ३६), गाेपीनाथ बुधा भील (वय ३८), दीपक छगन भील (३७), सुनील रामू भील (वय २९), ध्रुपदाबाई अर्जून भील (वय ५६), मैनाबाई गाेपीनाथ भील (वय ३५) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली अाहे. यात मैनाबाई भील व गाेपीनाथ भील हे दाेन्ही पती-पत्नी अाहे. सर्वच अाराेपी एकमेकांचे नातेवाईक अाहे.
रेवती येथील दीपक सुदाम पारधी (वय १६) यामुलाला १९ अॅाक्टाेबर २००७ रोजी किरकाेळ कारणावरून ११ संशयितांनी चापटाबुक्यांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण केली हाेती. दीपकच्या पाेटावर अाणि गुप्तांगावरसुध्दा मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बाेदवड पाेलिस ठाण्यात ११ जणांिवरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. यात दाेन अल्पवयीन मुले अाहे. हा खटला जळगाव येथील जिल्हा न्यायालयात सुरू हाेता. भुसावळ येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय सुरू झाल्यावर हा खटला भुसावळ न्यायालयात वर्ग करण्यात अाला. न्यायाधीश एस. बी. भन्साली यांच्यासमोर खटल्यातील अाठ जणांची साक्ष नाेंदवली. यात दीपक याचा भाऊ विजय पारधी, वडील सुदाम पारधी यांच्यासह तपासाधिकारी पी. बी. जाधव, जी.एस. माेरे यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. अाराेपींचे वकील अाणि सरकारी वकील यांचा युक्तीवाद एेकून घेत न्यायाधीश भन्साली यांनी बुधवारी शिक्षेचा निकाल दिला. न्यायाधीश भन्साली यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावताच सर्व अाराेपींना रडू काेसळले. पाेलिस रूममध्येही महिला माेठ्याने रडल्या तर चारही पुरूषांच्या डाेळ्यातून पाणी अाले हाेते. अाराेपींच्या नातेवाइकांनी भेटण्यासाठी गर्दी केली हाेती. सरकारतर्फे अॅड. िवजय खडसे यांनी काम पाहीले. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यावर दाेन्ही महिलांसह सहाही अाराेपींना नंतर बाेदवड पाेलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालय परिसरात पाेलिसांचा माेठ्या प्रमाणावर बंदाेबस्त तैनात केला हाेता तसेच निकाल ऐकण्यासाठी बाेदवड तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली हाेती.