भुसावळ (प्रतिनिधी) – येथील स्व. गोकुळ नामदेव पाटील यांची मुलगी व अनिल पाटील यांची पुतणी प्रीती च्या साखरपुड्यासाठी तळवेल येथे बुधवार ३ रोजी आले होते. त्यांनी साखरपुड्यातच विवाह आटोपून समाजासमोर एक आदर्श ठेवला. परंतु लग्न समारंभानंतर आगेमाेहाेळ उठल्याने वऱ्हाडींना मधमाशांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रचंड धावपळ करावी लागली. या घटनेत २० ते २५ जण जखमी झाले अाहेत.
तालुक्यातील तळवेल येथील संजय नारायण कापसे यांचा मुलगा तुषार (वय २३) व भुसावळ येथील स्व. गोकुळ पाटील यांची मुलगी व अनिल पाटील यांची पुतणी प्रीती (वय १९) या दाेघांचा साखरपुडा होता. वधू पक्षाकडील मंडळी तळवेल येथे आली होती. दोन्ही पक्षांनी ठरविला, विवाह सोहळा करावा अशी इच्छा व्यक्त केली. अर्थात कुठलीही अपेक्षा न बाळगता यावर वधू कडील मंडळीनी एकत्र येवून विवाह सोहळा करण्याचे निश्चित झाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज विवाह सोहळा पार पडला. परंतु अचानक मधमाशांंच्या हल्ल्याने कार्यालयात धावपळ उडाली.