राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा ; अजित पवार यांच्यासह शपथ घेणाऱ्यांना नसल्याचे स्पष्ट
मुंबई (प्रतिनिधी) – राष्ट्रवादी पक्षाचे धोरण शिंदे गट आणि भाजपला पाठिंबा देण्याचे नसून राष्ट्रवादी पक्षाचे विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी राजभवनामध्ये जाऊन शपथ घेतली . शरद पवारांच्या पाठीशी महाराष्ट्रमधील राष्ट्रवादी पक्ष आहे. सत्तारूढ पक्षाकडे जाऊन अजित पवार यांनी शपथविधीचा कार्यक्रम घेतला आहे . या घटनेमुळे अनेकजण याचा निषेध व्यक्त करीत असून शरद पवार यांच्या पाठीमागे सर्वजण उभे आहेत . संकटे जेव्हा येतात तेव्हा शरद पवार सर्वात जास्त ताकदीने पुढे येतात , त्यामुळे अशा पक्ष फोडाफाडीचे राजकारण साध्यासुरु असून अजित पवारांच्या भूमिकेला पाठिंबा नसल्याचा खुलासा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला .
अनेक आमदारांचे सत्ताधाऱ्यांसोबत सामील होण्याबाबत कन्फ्युजन असून शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा अजित पवारांच्या शपथविधीला पाठिंबा नसल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आआपली भूमिका मांडली. शरद पवार यांना सर्वांचाच पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. येत्या ५ जुलै रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे राज्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मुबंईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ताधाऱ्यानी विरोधी पक्ष फोडण्याचे काम केले आहे. सध्या शिवसेनेतून पक्ष फोडून सत्ता स्थापन करण्यात आली. आता राष्ट्रवादी पक्ष फोडण्यात आला आहे. सध्या पक्ष फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे . ज्या नऊ जणांनी राष्ट्रवादीचा आदेश झुगारून शपथविधी घेतला आहे . त्याचा विरोध करण्यात आला आहे. अनेक आमदारांनी आम्ही कशावर सह्या केल्या आहेत हे माहीत नसल्याचे काही आमदारांनी सांगितल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे शपथ घेणार्यांना राष्ट्रवादीचा कुठलाही पाठिंबा नसल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले .