रावेर ( प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरूणीने शहरानजीकच्या एका शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी उघडकीला आली आहे.
रावेर तालुक्यातील वडगाव येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणारी तरूणी शितल मुकेश वाघोदे (वय-१९) ही तरूणी बुधवारी २८ जून रोजी कॉलेजला रावेरला जात असल्याचे सांगूल घरातून गेली होती. त्यानंतर ती घरी न असल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेतला. तालुक्यातील अजंदा रस्त्याने एका शेतात शेतमजूरीच काम करणाऱ्या महिलांना त्याच शेतात असलेल्या विहीरीजवळ शाळेची बॅग व चप्पल आढळून आली. तिच्या बॅगेत तपासणी केली असता ती वडगावची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रावेर पोलीसांनी घटनास्थळी जावून विहिरीत शोध घेतला असता ती दिसून आली नाही. आज गुरूवारी २९ जून रोजी सकाळी पुन्हा विहिरीत शोध घेतला असता तिचा मृतदेह पाण्यात दिसला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत रावेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.