भुसावळ (प्रतिनिधी) – आषाढी एकादशी निमित्त गुरूवार दिनांक 29 जून रोजी सांस्कृतिक कला निकेतन तर्फे पंढरीचे वारकरी, आम्ही टाळकरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सांस्कृतिक कला निकेतन, भुसावळ तर्फे गुरूवार 29 रोजी सायंकाळी 05.30 वाजता तापी नगर येथील श्री सप्तशृंगी माता मंदिर परिसरात पंढरीचे वारकरी, आम्ही टाळकरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे हे पहिलेच वर्ष असून यात तब्बल 150 महिलांचे समूह नृत्य सादर होणार आहे. याप्रसंगी आमदार संजय सावकारे, प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनी सावकारे, ताप्ती एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष मोहन फालक, सौ स्मिता फालक, डॉ उल्हास पाटील सी बी ऐस ई स्कूल भुसावळ मुख्याध्यापिका अनघा पाटील, सप्तशुंगी मंदिर ट्रस्ट भुसावळ चे अध्यक्ष डॉ जे के भिरूड यांची उपस्थिती राहणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सहभागींचा उत्साह वाढवावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन सांस्कृतीक कला निकेतन प्रमुख मुकेश खपली यांनी केले आहे.