जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील मोहाडी येथील उद्या तरुणाचा रेल्वेखाली आल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडले आहे याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
प्रवीण पितांबर भिल वय 20 राहणार मोहाडी तालुका जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे तो मोहाडी गावामध्ये आई-वडील लहान भाऊ आणि बहिणीसह राहतो प्रवीण आणि त्याचे वडील दोघे ट्रॅक्टर चालक असून गावातच मजुरी करतात प्रवीण भिल याचा मागील महिन्यात ा साखरपुडा झालेला आहे मंगळवारी रात्री तो मोहाडी गावाजवळ एक पूल भागाजवळ आला तेथे एका रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच कुटुंबीयांनी आणि गावातील नातेवाईकांनी आक्रोश केला दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.