• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मालकाचा विश्वासघात करून टप्प्याटप्प्याने चोरल्या तब्बल ३० दुचाकी !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 14, 2023
in Uncategorized
0

एलसीबीने नोकराला घेतले ताब्यात,

भडगाव शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – मालकाचा विश्वासघात करून तात्पुरता कामावर लागलेल्या नोकरानेच दुचाकी विक्रीच्या शोरूम मधून थेट ३० दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. एलसीबीच्या पथकाने त्याला शिताफीने ताब्यात घेतले आहे. त्याने २६ दुचाकी काढून दिल्या असून पोलिसांचा तपास सुरूच आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावसाहेब केशव पाटील (वय ५६, रा. गणेश कॉलनी, भडगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचे भडगाव येथे साई ऑटो बजाज शोरूम आहे. ११ जून रोजी दुपारी ३ वाजेपूर्वी अज्ञात चोरटयांनी रावसाहेब पाटील यांच्या शो रूम मधून २२ लाख ७७ हजार ९८० रुपयांच्या ३० दुचाकी नियोजन करून टप्प्याटप्प्याने चोरून नेल्या. रावसाहेब यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने भडगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.

तक्रारीवरून पोलिसांना तपास सुरु केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकानेही त्यांचे काम सुरु केले. त्यांनी शोरुममधील मेकॅनिक शोएब खान रऊफ खान रा. नगरदेवळा ता. पाचोरा यांच्याकडे संशय आल्याने लक्ष केंद्रित केले. तो मागिल दहा महिन्यापासून काम करीत होता. शोएब हा सकाळी आठ वाजता शोरूमला जाऊन साफसफाई करत असायचा. यावेळी शोरूममध्ये कोणी नसायचे. हि संधी साधून शोरूम मधून दोन महिन्यांत एक ते दोन दिवसाआड नवीन कोरी एक दुचाकी गायब करायचा. अश्याप्रकारे दोन महिन्यांत १४ पल्सर व १६ प्लॅटिना तब्बल ३० नवीन विनानंबरच्या को-या दुचाकींची त्याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

नागद गावात एक व्यक्ती नवी कोरी दुचाकी घेऊन फिरत असताना त्याला संशयावरून पोलिसांनी विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्याला विश्वासात घेतल्यावर, त्याने भडगाव येथील संशयित आरोपीचे नाव सांगितले. तेव्हा हा गुन्हा उघड झाला आहे. शोएब खान याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पीएसआय गणेश वाघमारे, विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, लक्ष्मण पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, महेश महाजन, राहुल पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, प्रमोद ठाकुर, मोतीलाल चौधरी या पथकाने ही कारवाई केली आहे.

संशयित शोएब खान आणि इतर अज्ञात संशयितांनी चाळीसगाव,मालेगाव, सिल्लोड, वैजापूर, औरंगाबाद, पिशोर, कन्नड, भराडी, बाळापूर ,नागद, जामठी अशा विविध भागांमध्ये दुचाकी कमी किमतीत विक्री केल्या आहे. या दुचाकीतून ११ पल्सर, १५ प्लेटीना अशा १९ लाख ५८ हजार १३९ रुपयांच्या २६ दुचाकी जमा करण्यात आल्या आहेत. शोएब सोबत त्याला मदत करणाऱ्या इतर संशयित साथीदारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/motor-cycal-chor-news/
Previous Post

…अखेर “त्या” मारहाणीबद्दल खुनाचा गुन्हा दाखल, चारही संशयित अटकेत

Next Post

पवित्र विद्यानगरीत लाचेचा खेळ, शिक्षकांना मागितले ७५ हजार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पवित्र विद्यानगरीत लाचेचा खेळ, शिक्षकांना मागितले ७५ हजार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!
1xbet russia

रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!

June 26, 2026
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल
1xbet russia

बिअर शॉपीचे शटर तोडून रोकडसह मद्याची चोरी; मारवड पोलिसांत गुन्हा

June 26, 2026
अपक्ष आमदार गोकुळ गीते यांची शिवसेनेला साथ; ‘सहयोगी सदस्य’ म्हणून काम करण्याची घोषणा
1xbet russia

अपक्ष आमदार गोकुळ गीते यांची शिवसेनेला साथ; ‘सहयोगी सदस्य’ म्हणून काम करण्याची घोषणा

June 26, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध!
1xbet russia

खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘त्या’ आक्षेपार्ह वक्तव्याचा जळगावात तीव्र निषेध!

June 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!

रामटेकच्या भव्य कुस्ती स्पर्धेत जळगावच्या सौरभ पवारचा डंका; पटकावली २.५ किलोची मानाची चांदीची गदा!

June 26, 2026
शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल

बिअर शॉपीचे शटर तोडून रोकडसह मद्याची चोरी; मारवड पोलिसांत गुन्हा

June 26, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon