पाचोरा (प्रतिनीधी) भडगाव तालुक्यातिल अंतुर्ली बु।।येथिल वि.का.सोसायटीच्या चेअरमनपदी ॲड.प्रविण पाटिल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अंतुर्ली बु।। विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची नुकतीच सभा संपन्न झाली.यावेळी ॲड.प्रविण भिकन पाटिल यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या सभेला संस्थेचे माजी चेअरमन रणजित पाटील, शिवाजी पाटील, विकास पाटील, दिनकर पाटील, प्रदिप पाटील, मनोज पाटील, लक्ष्मण पाटिल, दादाभाऊ गोसावी, भगवान पाटील यांच्यासह माजी सरपंच रविंद्र पाटील,ग्रामपंचायत सदस्य मनोज रामराव पाटील,संस्थेचे सचिव देसले आदी उपस्थित होते. बिनविरोध चअरमनपदी निवड झाल्याबद्दल उपस्थितांनी ॲड.प्रविण पाटील यांना शुभेच्छा देत सत्कार केला. तसेच पाचोरा तालुका वकिल संघातर्फेही त्यांचा सत्कार करण्यात आला.