• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

थरार ! पोलिसांनी केला चोरट्यांचा सिनेस्टाइल पाठलाग

पारोळ्यात थांबले नाही ; अखेर भडगावात घेतले ताब्यात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 15, 2023
in Uncategorized
0

दोघांना अटक, तीन फरार ;

एक पोलीस जखमी

एरंडोल (प्रतिनिधी) – सोमवारी पहाटे साडेतीन वाजता रात्री गस्त घालत असताना एका स्कॉर्पिओ चालकाला पारोळा पोलिसांनी वाहन थांबविण्यास सांगितले. मात्र वाहन न थांबविता त्यांनी वाहन भरधाव हाकले. पोलिसांनी पाठलाग सुरु केला. संशयित चोरटे हे पारोळा, कासोदा, एरंडोल मार्गे भडगावात गेल्यावर तेथील शासकीय वाहनाला धडकले. तेव्हा त्यातील दोघांना ताब्यात घेण्यात आले. तर तिघे फरार होण्यात यशस्वी झाले आहे.

पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव हे त्यांचे सहकारी हवालदार कोळी ,राठोड, मिस्तरी, यांचेसह रात्रीची गस्त घालत होते. पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ क्रमांक एमएच १८ डब्ल्यू ६७० सह भरधाव वेगाने जात असल्याचे दिसून आले. पोलीस पथकाने थांबण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पळवले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक राजु जाधव यांनी एरंडोल पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद बागल यांच्याशी संपर्क साधून एरंडोल येथे नाकाबंदी करण्याचे सांगितले. उपनिरीक्षक शरद बागल यांनी हवालदार संतोष चौधरी, किरण पाटील यांचे सह धरणगाव चौफुली येथे बॅरिगेट्स लावून नाकाबंदी केली.

तसेच शहरात गस्त घालत असलेले हवालदार संदीप पाटील व सपकाळे यांना घटनेची माहिती देऊन तात्काळ कासोदा रस्त्यावर जाण्याचे सांगितले. एरंडोल व पारोळा येथील पोलीस पथक सदर वाहनाच्या सिनेस्टाईल पाठलाग करीत असताना संशयित वाहनाच्या चालकाने राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या दत्त मंदिराजवळील रस्त्याने वाहन वळवून कासोदाकडे पलायन केले. संशयित वाहन कासोद्याकडे गेल्यामुळे उपनिरीक्षक शरद बागल यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच कासोदा स्टेशनचे उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्याशी संपर्क साधून नाकाबंदी करण्यास सांगितले. संशयित स्कार्पिओ चालकाने कासोदा येथील लावण्यात आलेले बॅरिगेट्स उडवून आडगाव मार्गे भडगावकडे पलायन केल्यामुळे उपनिरीक्षक शरद बागल यांनी भडगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी भडगाव येथे नाकाबंदी केली. पोलिसांनी भडगाव येथे सदरचे वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र स्कार्पियो चालकाने भडगाव पोलीस स्टेशनच्या शासकीय वाहनास धडक दिली. यात पोहेकॉ विलास बाबुराव पाटील यांच्या उजव्या हाताला मुक्कामार लागला आहे. त्यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांच्या वाहनाचे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी स्कार्पिओसह दोन संशयित मुकेश विठ्ठल पाटील (वय २४ रा पाळधी ता धरणगाव), रोशन मधुकर सोनवणे (वय ३३, अंबिका नगर, वडजाई रोड धुळे) यांना ताब्यात घेतले असून त्यांचे इतर तीन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांनी दोन्ही संशयितांची चौकशी केली असता ते गुरे चोरणारे टोळी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून संशयतांकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलीस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे मार्गदर्शनाखाली भडगावचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पारोळ्याचे उपनिरीक्षक राजू जाधव, एरंडोलचे उपनिरीक्षक शरद बागल, कासोद्याचे उपनिरीक्षक अमोल गुंजाळ व पोलीस कर्मचाऱ्यांनी सुमारे दीड तास सिनेस्टाईल पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखवताच संशयित आरोपींनी इतर सहकारी फैय्याज शेख रा. पाळधी, शशिकांत सदाशिव मोरे, रा मोहाडी जि धुळे यांचेसह पाचवा आरोपी अनोळखी असून नाव माहीत नसल्याचे सागितले.


 

 

Tags: #erondol crime news #maharashtrahttps://kesariraj.com/tharar-15-may-23-n-8/
Previous Post

जळगाव तालुक्यात धरणात बुडून बालकाचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या ‘समर कॅम्प-२०२३’चा समारोप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जैन स्पोर्टस् अॅकडमीच्या ‘समर कॅम्प-२०२३’चा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

जळगाव जनता बँकेने ‘सील’ केलेली मालमत्ता परस्पर उघडली

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon