• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कंपनीत धाडसी चोरी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

एमआयडीसी पोलिसांची यशस्वी कामगिरी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2023
in Uncategorized
0

जळगाव (प्रतिनिधी) – भिंतीच्या खाली खड्डा खोदून एमआयडीसी परिसरातील एच.डी.फायर कंपनीमध्ये प्रवेश करून १ लाख ४५ हजार ३०० रूपयांचा माल लांबविण्यात आला होता. याप्रकरणी जुन्या कामगारासह त्याच्या दोन साथीदारांना सोमवारी रात्री कुसूंबा व सुप्रिम कॉलनी परिसरातून एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी त्यांना न्यायाधीश जे.एस.केळकर यांच्या न्यायालयात हजर केले असता, १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मंगळवार, दि. २ मे रोजी मध्यरात्री एमआयडीसी येथील एच.डी.फायर कंपनीच्या संरक्षक भिंती खाली खड्डा खोदून चोरट्यांनी कंपनीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर १ लाख ३२ हजार ३०० रूपये किंमतीचे मिडल एल्बो आणि १३ हजार रूपये किंमतीचे एनगॉट ब्राँझ धातूच्या पट्टया चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक मोहन कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. पोलीस तपास सुरूच होता. एच.डी.फायर कंपनीमध्ये गेल्या दोन महिन्यांपूर्वी काम सोडून गेलेला कामगार देवानंद उर्फ देवा गोकूळ कोळी (रा. रामेश्वर कॉलनी) याने त्याचे मित्र विक्की आत्माराम कोळी (३२) व ईश्वर श्रावण महाजन (३४, दोन्ही रा. रामेश्वर कॉलनी) यांच्या मदतीने चोरी केल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांच्या पथकाला मिळाली. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी लागलीच तिघांचा शोध घेण्यास सुरूवात केली.

काही दिवसांपासून तीन तरूण दररोज मौजमजा करीत असून प्रचंड खर्च करीत आहेत, अशी माहिती पोलिसांना सोमवारी कळली. रात्रीच पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर तिघांमध्ये एक चोरी करणारा जुना कामगार आणि त्याचे दोन्ही साथीदार असल्याची बाब समोर आली. कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांना न्यायालयात हजर केले असता, १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. रंजना पाटील यांनी कामकाज पाहिले. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, छगन तायडे, किरण पाटील, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंडे, ललित नारखेडे यांनी ही कारवाई केली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/9-may-23-n-10/
Previous Post

आव्हाणे गावात संतप्त ग्रामस्थांनी ट्रॅक्टर पेटविले

Next Post

हिंगोणाजवळच्या मोरधरण शिवारात महिलेचा मृतदेह आढळला

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हिंगोणाजवळच्या मोरधरण शिवारात महिलेचा मृतदेह आढळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा
Uncategorized

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक
1xbet russia

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ
1xbet russia

 माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव ; अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ

March 31, 2026
… तर मी राजीनामा देऊन राजकारणातून निवृत्त होईल
1xbet russia

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावसह राज्यातील महानुभाव पंथाच्या तीर्थक्षेत्रांची नोंदणी अधिवेशनापूर्वी पूर्ण करा

जळगावच्या हिंगोणेत केळी टिश्यू कल्चर प्रकल्पाला २० हेक्टर जमीन देण्यास शासनाची मंजुरी

March 31, 2026
जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

जळगाव मेहरूण परिसरात प्रॉपर्टीच्या वादातून दोन गटात वाद, तुंबळ दगडफेक

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon