जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी अभियांत्रिकी मध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्नेहसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 मे 2023 रोजी विद्यार्थ्यांमार्फत ग्रुप डे, ट्विंस डे आणि हॅलोविन डे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय धमाल करताना ग्रुप डे व ट्विन्से डे मध्ये वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून वेगवेगळे ग्रुप मंचावर येऊन अतिशय सुंदर पद्धतीने सादरीकरण केले.
तसेच हॅलोविन डे मध्ये भुताटकीच्या रंगभूषेमध्ये विद्यार्थ्यांनी रंगमंचावर अतिशय उत्कृष्ट असे सादरीकरण केले.
या संपूर्ण कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ग्रुप / ट्विन्स डे विजते
प्रथम – इंजीनियरिंग सॅपर्स (कॉलेज थीम)
द्वितीय – मेकॅनिकल के दिवाने (कॉमेडी डान्स)
ट्विन्स डे विजेते
वेद जैन व सोहम पाटील
हॅलोविन डे विजेते
प्रथम – दिव्या काळे
द्वितीय – रोशनी पाटील
तृतीय -राम सोनवणे व उन्नती लांबोळे
ग्रुप डे कार्यक्रमासाठी प्रथमेश पवार व श्वेता बोरसे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. तसेच हॅलोवीन डे या कार्यक्रमासाठी नम्रता संगेले व अंशिका पाटील यांनी सूत्रसंचालन केले.