जळगाव (प्रतिनिधी) : येथील शेख परिवारातील सात वर्षीय कन्येने शाळा चालू असतानाही तसेच शाळा संपल्यावर उन्हाळी शिबिरात जात असतानाही पवित्र रमजान महिन्याचे पूर्ण रोजे यशस्वीरित्या पूर्ण केले. याबद्दल तिचे समाजातून कौतुक होत आहे.
डॉ. शोएब शेख व डॉ. सुमय्या शेख यांची कन्या जरीन फातिमा हिने रमजान महिना सुरू झाल्यानंतर शाळा सुरू असताना देखील दर दिवसाचे रोजे ठेवले. शाळा संपल्यावर उन्हाळी शिबिर लागल्यावरही कुठलाही खंड न पडू देता नियमित रोजे ठेवले. दररोज परमेश्वराकडे, देशांमध्ये ऐक्य व शांतता नांदू दे अशी प्रार्थना करीत आहे. तिने पूर्ण रोजे ठेवल्यामुळे समाजातर्फे तिचं कौतुक होत आहे.