जळगाव (प्रतिनिधी) – शहरात सर्वत्र रस्ते दुरुस्तीचे व रस्ते बनविण्याचे काम सुरु आहे. पिंप्राळा येथे स्मशाभूमीजवळ खुल्या जागेवर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु होते. तेथे हॅण्ड काँक्रीट मिक्सर असलेले वाहन मागे घेत असतांना मागच्या चाकाखाली आल्याने मजूराचा दबुन दुदैवी मृत्यू झाल्याची घटना ३० मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरूण वसंत बाविस्कर (वय-४४) रा. कांचन नगर, जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अरूण वसंत बाविस्कर हे पत्नी व मुलासह शहरातील कांचन नगरातील उज्ज्वल चौकात राहतात. जळगाव शहरातील पिंप्राळा स्मशानभूमीजवळील खुल्या जागेवर रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. अरूण बाविस्कर हे देखील काम करत होते. गुरूवार ३० मार्च रोजी सकाळी १० वाजता रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू होते. यावेळी हॅण्ड काँक्रीट मिक्सर वाहन (एमएच १९ डीयू ४६६१) वरील चालक संजय राठोड रा. रामदेववाडी, जळगाव हा वाहन मागे घेत असतांना अरूण बाविस्कर हे मागच्या चाकाखाली आल्याने त्याचा दबुन जागेवरच दुदैवी मृत्यू झाला.
ही घटना घडल्यानंतर चालक हा पसार झाला. दरम्यान, सोबत असलेल्या कामगारांनी तातडीने मृतदेह जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चालक संजय राठोड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयताच्या पश्चात पत्नी सविता, तीन विवाहित मुली आणि सात वर्षाचा मुलगा शैलैश असा परिवार आहे.