जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील श्री दत्त मंदिरासमोरून एकाची २० हजार रूपये किंमतीच दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फहेद अहमद गनी शेख (वय-२९) रा. सुप्रिम कॉलनी, एमआयडीसी, जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह राहायला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवार १३ मार्च रोजी दुपारी ४ वाजता फहेद गनी हा त्याची दुचाकी (एमएच १९ बीसी ५७७२) ने जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील दत्त मंदिरासमोर आला होता. त्याठिकाणी सार्वजनिक रोडवर त्याने दुचाकी पार्क लावून कामाच्या निमित्ताने निघून गेला. सायंकाळी ६ वाजता तो त्याच्या दुचाकीजवळ आला असता त्याला दुचाकी जागेवर मिळून आली नाही. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी मिळून आली नाही. अखेर त्याने मंगळवार १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता जळगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक प्रफुल्ल धांडे करीत आहे.