• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

ॲग्रीकॉस – 1972 बॅचच्या कृषी पदवीधर विद्यार्थ्यांचा सुवर्णमहोत्सवी स्नेहमिलन सोहळा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2022
in Uncategorized
0

पाचोरा (प्रतिनिधी) – देशभर आजादीचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना धुळे येथील कृषी महाविद्यालयातील ॲग्रीकॉस-1968-72 बॅचच्या कृषी पदवीधर माजी विद्यार्थ्यांनी 50 वर्षानंतर एकत्र येऊन आपला सुवर्ण महोत्सवी स्नेहमिलन सोहळा पाचोरा येथे साजरा केला.

धुळे कृषी महाविद्यालयातील 1968-72 च्या माजी विद्यार्थ्यांनी दि. 24 व 25 डिसेंबर 2022 रोजी निर्मल सिडस्‌ येथे सुवर्णमहोत्सवी स्नेहमिलन सोहळा आयोजित केला होता. या माजी विद्यार्थ्यांनी बँकींग, कृषी संशोधन आणि विस्तार, राजकारण, उद्योग, शिक्षण, कृषी, सांस्कृतीक व सामाजिक क्षेत्रात उत्कृष्टपणे काम करुन आपल्या कामाचा ठसा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटविला आहे.

निर्मल सिडस्‌च्या भव्य प्रांगणात सकाळी 10 वाजता सर्वांचे सपत्नीक गुलाबाचे फुल देऊन स्वागत करण्यात आले. या सुवर्णमहोत्सवी स्नेहमिलन सोहळ्याला उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील यांची प्रुमख अतिथी म्हणुन प्रामुख्याने उपस्थिती होती.

सुरुवातीला प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व गणेशपुजन करण्यात आले. तद्‌नंतर निर्मल सिड्‌सचे व्यवस्थापकिय संचालक कै. मित्रवर्य तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. त्याचबरोबर बॅचमधील काही मित्र दिवंगत झालेले असल्यामुळे त्या सर्व मित्रांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी व्यासपिठावर माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील, निर्मल सिडस्‌चे संचालक डि.आर.देशमुख, डॉ.जे.सी.राजपूत, सौ. वैशालीताई सुर्यवंशी, नंदलाल वाघ, डॉ. सुहास वाणी, डॉ. सुरेश कुंभारे, श्री. मेहताबसिंग नाईक आदी उपस्थित होते. या सुवर्णमहोत्सवी स्नेहमिलन सोहळ्याचे प्रास्ताविक निर्मल सिडस्‌चे संचालक डी.आर.देशमुख यांनी केले. त्यानंतर सर्व कृषी पदवीधर माजी विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणून सर्वांना सपत्निक स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉ. सुहास वाणी, डॉ. सुरेश कुंभारे, निर्मल सिड्‌च्या संचालिका सौ. वैशालीताई सुर्यवंशी, श्री. मेहताबसिंग नाईक इत्यादी मान्यवरांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा दिला. सायंकाळी वयाच्या सत्तरी नंतर करावयाचा योगा या विषयावर डॉ. अतुल सुर्यवंशी यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. त्यानंतर मिलींद कुलकर्णी यांच्या गोड आवाजातील सिनेगितांनी उपस्थितांची मने जिंकली.

दुसऱ्या दिवशी सकाळी आहार व विहारात गीतेचा उपदेश कसा अंमलात आणावा यावर दिलीप तांबोळी यांनी मार्गदर्शन केले. सर्व माजी विद्यार्थ्यांनी डी. आर. देशमुख यांचा सपत्निक सत्कार केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धुळे कृषी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नंदलाल वाघ, साहेबराव क्षीरसागर, सुधाकर मेतकर, विजय पाटील, वामन देवरे, अरुण आहेर, साहेबराव पाटील व इतर सहकारी मित्रांनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमासाठी निर्मल सिडस्‌चे संचालक डि.आर.देशमुख व इतर संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


 

Tags: #pachora news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

अट्टल गुन्हेगाराला अटक : अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाची कारवाई ; तिघांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाची कारवाई ; तिघांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात योग दिन उत्साहात
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगा दिवस

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon