नशिराबाद येथे जयंती सोहळा उत्साहात
नशिराबाद (प्रतिनिधी) – संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या पालखीचे पूजन जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर संपूर्ण गावात महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
संत जगनाडे महाराज यांचा आज जयंती सोहळा झाला. यापूर्वी आठ दिवसांपासून महाराजांच्या जयंतीनिमित्त हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. आज पालखी मिरवणुक व महाप्रसाधनंतर जयंती सप्ताहाचा समारोप श्री देवकर यांच्या हस्ते झाला.
यावेळी इटारसी येथील आचार्य मधुसूदन महाराज, ह.भ.प. पुंडलिक शास्त्री महाराज, तसेच श्री.देवकर यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, राष्ट्रवादीचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख पंकज महाजन, आयोजक कैलास व्यवहारे, नशिराबादचे माजी सरपंच गणपत भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नशिराबाद शहराध्यक्ष बरकत अली यांच्यासह शेकडोच्या संख्येने भाविक पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते.