पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात पारोळा पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पारोळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहायला आहे. १० डिसेंबर रोजी रात्री साडेदहा ते ११ डिसेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील राहुल छोटू अहिरे (वय – 22) या तरुणाने अल्पवयीन मुलीला काहीतरी फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, परंतु अल्पवयीन मुलगी कुठेही मिळून आली नाही. यासंदर्भात रविवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी पारोळा पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी राहुल छोटू अहिरे (वय – २२) रा. नगरदेवळा, ता. पाचोरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल शेख करीत आहे.