जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी दिल्या शुभेच्छा
जळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्य कर निरीक्षक या पदासाठी मागील वर्षी झालेल्या परीक्षेमध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील अनुराग सखाराम पाटील यांची राज्यकर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल खानदेशातून त्यांचे अभिनंदन होत असून माजी पालकमंत्री तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
अनुराग सखाराम पाटील हे शिरपूर तालुक्यातील गरताड येथील रहिवासी असून त्यांचे वडील सखाराम उत्तम पाटील शिरपूर सहकारी शेतकरी साखर कारखाना येथून सेवानिवृत्त झालेले आहेत. अनुराग पाटील यांच्या मातोश्री प्रा. मंगला पाटील या शिरपूर येथील आर. सी. पटेल अध्यापक विद्यालयात कार्यरत आहेत.
त्यांना मिळालेल्या यशाबद्दल माजी शिक्षण मंत्री तथा विधान परिषदेचे आ. अमरीशभाई पटेल आणि जळगाव जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी अभिनंदन केले आहे.