मुंबई (वृत्तसंस्था) – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून ट्रोल केलं जात असून ट्रोल करणाऱ्यांना आवर घालण्याची मागणी भाजप नेत्यांकडून केली जात आहे. त्याबाबत भाजपच्या काही नेत्यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार देखील दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाण चर्चा सुरू आहे. काही वापरकर्ते फडणवीसांच्या विरोधात बदनामकार पोस्ट करुन त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. तर काही जण फडणवीसांना धमकी देत असल्याची तक्रार विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर, भाजप खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांनी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली आहे. तसंच काही जणांनी राज्यपालांच्या टोपीवरही वक्तव्य केलं असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. अशा अश्लील पद्धतीने ट्रोलिंग व सोशल मीडियावर गैरसमज पसरविणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी मुंबई भाजपा शिष्ठ मंडळांने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले.