जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील पंढरपूर नगरात दहा मिनिटात येतो असे सांगून घराबाहेर गेलेल्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील पंढरपूर नगरात अल्पवयीन मुलगा त्याच्या कुटुंबियांसह राहायला आहे. १३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अल्पवयीन मुलाने घरात दहा मिनिटात येतो, असे सांगून तो बाहेर पडला. त्यानंतर तो पुन्हा घरी परतला नाही. सर्वत्र शोध घेवून त्याची कुठेही मिळून आला नाही. काहीतरी आमिष दाखवून अज्ञान व्यक्तीने त्याचे अपहरण केल्याचा संशय अल्पवयीन मुलाच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार शुक्रवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक निलेश गोसावी हे करीत आहेत.