चाळीसगाव (प्रतिनिधी ) -सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही चाळीसगाव जवळील मल्हारगड दसरा महोत्सव मोठा जल्लोसात साजरा करण्यात आला असून यावेळी गडाचे पूजन करून गडाला तोरणे पताका लाऊन सजवण्यात आले. गडावर छत्रपती शिवरायांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली . तसेच गडदैवत खंडोबाची तळी भरून आरती करण्यात आली सर्व उपस्थित दुर्गसेवक दुर्गसेविका यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आलेली असल्याने सर्वांनी मनसोक्त वनभोजनाचा आनंद देखील यावेळी घेतला. यावेळी चाळीसगाव तालुक्यातील जवळपास 200 महिला व पुरुष दुर्गसेवक दुर्गसेविका यांनी या महोत्सवात सहभाग घेतला.