• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भावांनी केली बहिणीची फसवणूक ; एमआयडीसी पोलीस ठाणेत गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 25, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शिरसोली येथील रहिवासी दोघे भावांनी बँकेतून पासबुक भरून आणतो सांगून एटीएमद्वारे विनापरवानगी परस्पर बहिणीच्या खात्यातून पाच लाख रूपयांची रक्कम काढून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बहिणीच्या फिर्यादीवरून दोन्ही भावांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाणेत गुन्हा दाखल केला आहे.

शिरसोली येथील रहिवासी शबनम शेख जाकीर पिंजारी या व त्यांचे पती इंजिनिअर असून कामानिमित्त ते सन २०१२ ते २०२१ पर्यंत सौदी अरेबिया येथे होते. शबनम शेख या सुध्दा २०१२ ते २०१८ पर्यंत तेथे राहत होत्या. त्या अधून-मधून शिरसोली येथे गावी येत होत्या. गावी आल्यावर पैशांची आवश्यकता भासल्यास एटीएमद्वारे पैसे काढून घेत होत्या. त्यावेळी त्यांचे दोन्ही भाऊ मेहमुद शमसोद्दीन पिंजारी (५२) व अशपाक शमसोद्दीन पिंजारी (४२, दोन्ही रा. शिरसोली) हे सोबत येत होते. २४ जुलै २०१७ रोजी शबनम शेख या घराची चावी मोठा भाऊ अशपाक याला देऊन पुन्हा सौदी अरेबियासाठी निघून गेल्या. २५ ऑक्टोंबर २०१७ रोजी शबनम यांच्या पतीने त्यांच्या बँक खात्यात ५ लाख रूपयांचा भरणा केला. तो भरणा झाला आहे की नाही तपासण्यासाठी त्यांनी पत्नीचा भाऊ अशपाक याला बँकेत जाण्यास सांगितले. दुस-या दिवशी अशपाक याने रक्कम जमा झाल्याचे कळविले. त्यानंतर अशपाक व मेहमुद याने बहिणीच्या घराच्या कपाटातून एटीएम काढून त्याद्वारे बँकेतील पाच लाख रूपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. २६ सप्टेंबर २०१८ रोजी शबनम या पुन्हा गावी परतल्या. त्यावेळी त्यांना दोन्ही भावांनी परस्पर विनापरवानगी रक्कम काढून घेतल्याचे कळाले. त्यांनी ती रक्कम परत करण्याचे सांगितले. मात्र, रक्कम परत केली नाही.

भावांनी परस्पर बँक खात्यातून रक्कम काढून घेतल्याचे शबनम यांनी पती जाकीर शेख सांगितले. त्यानंतर जाकीर शेख यांनी २९ एप्रिल २०२२ रोजी पत्नीच्या दोन्ही भावांकडे पैशांची मागणी केली. मात्र, दोघांनी त्यांना धक्काबुक्की करित शिवीगाळ केली. जाकीश शेख यांनी पोलिसात धाव घेतली. पण, तक्रार नोंदवून घेतली नाही.अखेर शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर रोजी पुन्हा एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावेळी शबनम पिंजारी यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या दोन्ही भावांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.


 

 

Tags: #crime #jalgaon #shirsoli
Previous Post

एकाची दुचाकी चोरी ; जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

विवाहितेचा छळ ; जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विवाहितेचा छळ ; जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव
खान्देश

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
क्राईम

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा
क्राईम

जळगाव एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला मोटारसायकल चोरीचा गुन्हा

September 27, 2026
मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..
जैन कंपनी

मनाला नवचैतन्य देणारे ‘Sunrise & Surrender’..

September 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

गोदावरी संगीत महाविद्यालय, जळगांव

September 27, 2026
बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

बाकडे काढण्याच्या वादातून मारहाण; ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

September 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon