शेंदुर्णी ता जामनेर (प्रतिनिधी )- शेंदुर्णी येथे अग्रसेन जयंतीनिमित्त अग्रवाल प्रगती महिला मंडळाच्या वतीने विविध सामाजिक सांस्कृतिक व स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यात समाज भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
शेंदुर्णी येथील प्राथमिक शाळेतील प्रातिनिधिक स्वरूपात काही मुलांना आमंत्रित करून पारस मंगल कार्यालय येथे शालेय साहित्य वाटप करण्यात आले . त्यानंतर तेथे झालेल्या आनंद मेळाव्यात त्यांना मोफत कुपन वाटप करण्यात आली. यावेळी बोलताना मंडळाच्या अध्यक्षा मनीषा अग्रवाल यांनी सांगितले की , गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. यापुढेही गरजू गरीब विद्यार्थ्यांना जी मदत आवश्यक असेल ती करण्याचा मंडळाच्या वतीने सदैव प्रयत्न राहील. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा मनीषा अग्रवाल ,उपाध्यक्षा अनिता अग्रवाल, सचिव शिल्पा अग्रवाल ,पूर्वी अग्रवाल, कोषाध्यक्ष पूजा अग्रवाल, छाया अग्रवाल ,सरिता अग्रवाल ,सोनम अग्रवाल ,कविता अग्रवाल, कीर्ती अग्रवाल, निर्मला अग्रवाल ,इंदू अग्रवाल ,दीपा अग्रवाल, मीनल अग्रवाल ,अंजू अग्रवाल ,नंदीनी अग्रवाल, मीना अग्रवाल, चमेली अग्रवाल ,प्राजक्ता अग्रवाल ,पूजा अग्रवाल ,प्रिया जागीरदार, अनिता अग्रवाल ,सूत्रसंचालन छाया अग्रवाल यांनी केले.