जळगाव ( प्रतिनिधी ) – तरूण शेतकऱ्याची शहरातील गोलाणी मार्केट परिसरातून मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत रविवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळजानंद रावण खैरनार (वय-३४) रा. मेहरूण, दत्तर नगर जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. गुरूवार ९ सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन वाजता तुळजानंद खैरनार हा मोटारसायकल क्रमांक (एमएच १९ सीके ४७०५) ने कामाच्या निमित्ताने आलेला होता. त्याने गोलाणी मार्केट परिसरात दुचाकी पार्क करून लावलेली होती. अज्ञात चोरट्याने त्याची २० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल चोरून नेली. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर रविवारी ११ सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.