बीजिंग (वृत्तसंस्था ) –भारतात कोरोनाचा उद्रेक कमी झाला असून मात्र, धोका अद्याप कायम संपलेला नाही. चीनमध्ये आता पुन्हा कोरोनाने डोकेवर काढले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने चीनच्या अनेक मोठ्या शहरांनी मंगळवारी कडक कोविड-19 निर्बंध लावण्यात आले आहे.शेन्झेन या शहरात पुन्हा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांना घरात राहावे लागले आहे.
कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला धोका पोहोचला आहे. आता आरोग्यासाठी नवीन चिंता निर्माण झाली आहे. शेन्झेनच्या दक्षिणेकडील टेक हबपासून नैऋत्य चेंगदूपर्यंत आणि डॅलियनच्या ईशान्य बंदरापर्यंतच्या शहरांत कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळते आहे. मोठ्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन लावला असून अनेक ठिकाणी व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.