सातारा (वृत्तसंस्था )- युवतीला खोलीमध्ये नेऊन तिच्या डोक्यावरून लिंबू फिरवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. मुक्तार नासीर शेख (वय २४, रा. राजसपुरा पेठ, सातारा) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , मुक्तार शेख याने २३ वर्षीय पीडित तरूणीला एका रुममध्ये नेले. या ठिकाणी त्याने तिच्या डोक्यावरून लिंबू फिरवून तिला भूरळ पाडली. त्यानंतर तिला बेडवर ढकलून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.