जिल्ह्यात लागोपाठ दोन खुनाच्या घटनेने जिल्हा हादरला
यावल (प्रतिनिधी ) – अज्ञात व्यक्तींनी अतिशय क्रूर पद्धतीने एका युवकाचा व्याजाच्या पैशांच्या कारणावरून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार आज पहाटे सांगवी फाटा ते डोंगरकठोरा रस्त्यावर उघडकीस आला असून याप्रकरणी यावल पोलिसांनी दोन महिला आणि एका पुरुषाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे चितोडा गावात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. मनोज संतोष भंगाळे (वय ४०) असे मयत युवकाचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , यावल तालुक्यातील सांगवी फाटा ते डोंगरकठोरा रस्त्यावर आज पहाटे एका तरूणाचा छिन्नविछीन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यात मृत व्यक्ती हा मनोज संतोष भंगाळे (वय ४०) असून तो चितोडा येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. मनोज भंगाळे हा साधारण व्यक्ती असून शेती आणि प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली. परंतु व्याजाच्या पैशातून हि हत्या झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरिक्षक राकेश मानेगावकर, उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून पंचनामा केला.