जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील ट्रान्सपोर्ट नगरला लागून असलेल्या आटो नगरमध्ये आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास खुल्या जागेत ठेवण्यात आलेल्या भंगार सामानाला आग लागल्याची घटना घडली . या आगीत भंगार सामान खाक झाले . मनपाच्या अग्निशामक दलाच्या बंबांनी आग आटोक्यात आणली.
याबाबत वृत्त असे कि , अजिंठा चौफुलीजवळ असलेल्या ट्रान्सपोर्ट नगर जवळ आटो नगर मध्ये आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास मोकळ्या जागेत ठेवण्यात आलेल्या भंगार सामानाला भीषण आग लागली . मनपाच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. दरम्यान ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी अनेक भंगार व्यावसायिकांनी आपले भंगार सामान ठेवलेले असतात. आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत हजारोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला.