जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील नवी पेठ भागातील बॉम्बे टायर दुकानासमोरून एकाची मोटोरसायकल चोरीला गेली आहे. याबाबत शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी रात्री शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शरद यशवंत पवार (वय – ५१ ) राहणार गणेश वाडी, जळगाव हा तरुण आपल्या कुटुंबियांसह राहायला आहे. ज्वेलर्स कॉलनीतील महावीर ज्वेलर्स दुकानावर नोकरीला आहे. शुक्रवार ५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याने त्याची दुचाकी (एमएच १९ सीए २७१५) ही कामाच्या ठिकाणी जैन मंदिराच्या मागे बॉम्बे टायर जवळ पार्किंग करून ठेवली होती.
दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल चोरून नेली. परिसरात स्वतः सर्वत्र शोधाशोध केली असता दुचकी कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी शुक्रवार ५ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक योगेश पाटील करत आहे.