जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील भोलाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालय येथे नितीन सुरेश कोळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणासह वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले.
या शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी यांच्याकडून वृक्ष लागवड करण्यात आली हे विद्यार्थी त्या वृक्षाचे संगोपन करतील अशी शपथ सर्व विद्यार्थ्यांनी घेतली सुरेश बळीराम कोळी ( सेवानिवृत्त सहाय्यक गट विकास अधिकारी ) यांच्याकडून या दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना पेन व पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमास उपसरपंच आनंदराव रामचंद्र कोळी, आकाश रामकृष्ण कोळी, अमोल कोळी यांचे सहकार्य मिळाले