पारोळा ( प्रतिनिधी ) – महसूल दिनानिमित्त व स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवानिमित्त तहसील कार्यालयात शासकीय सेवा बजावत असतांना आपणही समाजाचं देणं असून त्यासाठी सामाजिक बांधिलकी जोपासत पारोळामहसूल विभागातर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात तहसीलदार अनिल गवांदे सह एकूण महसूल कर्मचारी ,तलाठी कर्मचारी यांच्यासह एकूण 42 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. या भव्य रक्तदान शिबिरात तहसीलदार अनिल गावांदे,नायब तहसीलदार भानुदास शिंदे, मुळीक रावसाहेब , निवडणूक नायब तहसीलदार शांताराम पाटील, महसूल कर्मचारी वारकर नाना, अनिल परदेशी, महेश जाधव , तलाठी शिंदे अप्पा, निशिकांत माने ,भूषण बाविस्कर, प्रशांत निकम, शेळके अप्पा आदी उपस्थित होते.