चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – वडगाव – रहिपूरी मार्गावर मोटारसायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने मोटारसायकलवर बसलेल्या वडिलांचा मृत्यू झाला व त्यांचा मुलगा आणि सून जखमी झाली. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला
तुलसीदास शंकर वाघ (वय-३४ , रा. भोरस ) , त्यांचे वडील शंकर वाघ आणि पत्नी मिना वाघ यांच्यासोबत १४ जुलै रोजी मोटारसायकल (एमएच १९ डब्ल्यू ३६५५) ने सकाळी शेतात वडगाव ते रहिपूरी रस्त्याने जात होते. मागून भरधाव वेगाने येणारी अज्ञात पिकअप व्हॅनने त्यांना धडक दिली. यात शंकर वाघ हे खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला मिना वाघ जखमी झाल्या. अपघातानंतर अज्ञात वाहन घटनास्थळाहून पसार झाला तुलसीदास वाघ यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो ना प्रकाश कोळी करीत आहेत .